Home Cities यावल काँग्रेसला धक्का : वड्री गावातील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश !

काँग्रेसला धक्का : वड्री गावातील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश !

0
236

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यावल तालुक्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. वड्री गावातील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने काँग्रेसचा या गावात ‘सुपडा साफ’ झाला आहे. हा प्रवेश पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि यावल-रावेर मतदारसंघाचे आ.अमोल जावळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हा भव्य प्रवेश सोहळा वड्री गावातील माजी जि.प.सदस्या सविताताई भालेराव आणि सरपंच अजय भालेराव यांच्या प्रयत्नांतून पार पडला. ग्रामपंचायत सदस्य फकीरा अरमान तडवी आणि परवीन मुबारक तडवी यांच्या नेतृत्वाखाली गावातील अनेक महत्त्वाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. या प्रवेशामुळे वड्री गावात भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून, आगामी निवडणुकांमध्ये याचा मोठा फायदा पक्षाला होण्याची शक्यता आहे.

प्रवेश केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये अमित इतबार तडवी, नामदार जमशेर तडवी, सलीम अहमद तडवी, रुबाब नवाब तडवी, सिकंदर सुजान तडवी, असलम हसन तडवी, मुस्तफा यासीन तडवी, तुरेबाज अकबर तडवी, अयमद बशीर तडवी, अल्लाउद्दीन साहेबु तडवी, खेतिया पटला, मुलजी बारेला, भरत बारेला, कालसिंग बारेला, लाकड्या बारेला, जुम्मा तडवी, मुशीर वैजू तडवी, कलिंदर सिकंदर तडवी, नशीर निजाम तडवी, संजय गणेश रस्तुल, बाई सुलेमान तडवी आणि सकीना अरमान तडवी यांचा समावेश आहे. या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला वड्री गावात अधिक बळकटी मिळाली आहे.

या प्रवेश सोहळ्याला प्रदेश परिषद सदस्य हिरालाल चौधरी, प्रदेश सदस्य हर्षल पाटील, खरेदी विक्री संघ उपसभापती अतुल भालेराव, खरेदी विक्री संघ संचालक विलास चौधरी, देविदास पाटील, उमेश फेगडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे, संचालक सागर महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे, वड्री गावचे उपसरपंच पंकज चौधरी, माजी सरपंच ललित चौधरी, विकास सोसायटीचे चेअरमन उमाकांत पाटील, संदीप चौधरी, किनगाव मंडळ कोषाध्यक्ष दिनेश पाटील, यावल मंडळ अध्यक्ष सागर कोळी, भाजपचे सरचिटणीस उज्जैनसिंग राजपूत, भरत पाटील आणि ज्ञानेश्वर तायडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रवेशामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.


Protected Content

Play sound