जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर येथील पुलाजवळ अज्ञात रिक्षा चालकाने दुचाकीला समोरून धडक दिल्याने तरुण जखमी झाल्याची घटना शुक्रवार २० सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता घडले आहे. या संदर्भात शनिवारी २० सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सम्राट सुरेश सोनवणे (वय-३०, रा. सत्यम पार्क, जळगाव) हा तरुण त्याच्या दुचाकीने शुक्रवारी १९ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता शहरातील टावर चौक येथून घरी जाण्यासाठी छत्रपती शिवाजीनगर उड्डाण पुलावरून जात असताना उतरतीवर एका अज्ञात रिक्षाने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांच्या गुडघ्यावर पायावर हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच त्यांच्या मोबाईलचे ही नुकसान झाले, जखमी अवस्थेत त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार शनिवारी २० सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक किरण ठाकरे हे करीत आहे.




