Home क्राईम रोटाव्हेटरमध्ये पाय व हात अडकून शेतकऱ्याला दुखापत; चालकावर गुन्हा दाखल !

रोटाव्हेटरमध्ये पाय व हात अडकून शेतकऱ्याला दुखापत; चालकावर गुन्हा दाखल !

0
183

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील भादली शिवारातील शेळगाव रस्त्यालगतच्या एका शेतात रोटाव्हेटरचे काम करत असताना ट्रॅक्टर चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका शेतकऱ्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जखमी शेतकऱ्याने उपचार घेतल्यानंतर शनिवारी, २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिगंबर गणू ठोसर (वय ४२, रा. भादली) हे शेतकरी असून, त्यांच्या भादली शिवारातील शेतात १२ जुलै रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटाव्हेटरचे काम सुरू होते. त्यावेळी सुनील सोमा सुरवाडे (रा.न्हावी, ता. यावल) हा ट्रॅक्टर चालवत होता. काम सुरू असताना ट्रॅक्टर चालकाने अचानक भरधाव वेगाने ट्रॅक्टर मागे घेतल्यामुळे शेतात उभे असलेले दिगंबर ठोसर यांचा हात आणि पाय रोटाव्हेटरमध्ये अडकला. या अपघातात दिगंबर ठोसर यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर तात्काळ नाशिक येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात जाऊन ट्रॅक्टर चालक सुनील सुरवाडे याच्याविरोधात निष्काळजीपणाने वाहन चालवून दुखापत केल्याची फिर्याद दिली.

या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रॅक्टर चालक सुनील सोमा सुरवाडे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अलियार खान करत आहेत.


Protected Content

Play sound