Home क्राईम विजेच्या धक्क्याने ३ जण जखमी; उपचार सुरू !

विजेच्या धक्क्याने ३ जण जखमी; उपचार सुरू !

0
165


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घराच्या गच्चीवर सुकायला टाकलेली गोधडी काढायला गेलेल्या अजय बुधा सोनवणे (वय १४, रा. मेहरुण) याला घराजवळून गेलेल्या वीजवाहक तारांचा स्पर्श होऊन तो गंभीर जखमी झाला. इतर दोन जणांनाही इजा झाली. ही घटना शनिवारी २० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मेहरुण परिसरात घडली.

पितृपक्ष संपून नवरात्र सुरू होणार असल्याने या काळात घरोघरी साफसफाई करण्यासह घरातील कपडे, गोधड्या, भांडे धुतली जातात. त्यानुसार गच्चीवर धुतलेल्या गोधड्या काढण्यासाठी अजय गेला होता. घराच्या गच्चीजवळून वीजवाहक तारा गेलेल्या आहेत. त्या तारांचा स्पर्श झाला व अजय त्याला चिटकला. हा प्रकार आजूबाजूच्या मंडळींच्या लक्षात आला व मोठी गर्दी झाली. त्या वेळी मनोज शिवराम पाटील यांनी लाकडी काठीच्या आधारे अजयची सुटका करून त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू आहेत. इतर दोन जणांनाही विजेचा धक्का लागून किरकोळ इजा झाली. या संदर्भात अद्याप पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.


Protected Content

Play sound