Home राजकीय शिवसेना ठाकरे गटाच्या तालुका प्रमुखपदी बंटी महाजन

शिवसेना ठाकरे गटाच्या तालुका प्रमुखपदी बंटी महाजन

0
287


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रावेर तालुक्यातील नेतृत्वात एक महत्त्वाचा बदल करत युवा चेहरा असलेल्या नितीन उर्फ बंटी महाजन यांची तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे रावेरमधील शिवसैनिक, विशेषतः युवा कार्यकर्त्यांमध्ये, उत्साह संचारला आहे. ही निवड आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

मागील अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय असलेले बंटी महाजन हे शेतकरी आणि युवकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत आले आहेत. सर्व जातीधर्मातील लोकांमध्ये त्यांची चांगली ओळख आहे. त्यांच्या या कामाची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास टाकत तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढवण्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्यासोबतच उपप्रमुखपदी संजय भामरे आणि शहर प्रमुखपदी संतोष महाजन यांचीही निवड करण्यात आली आहे, ज्यामुळे पक्षाचे नेतृत्व अधिक मजबूत झाले आहे.

बंटी महाजन यांच्या नियुक्तीबद्दल बोलताना जिल्हा प्रमुख दिपक सिंह राजपूत, लोकसभा समन्वय प्रल्हाद महाजन आणि उप जिल्हा प्रमुख योगीराज पाटील यांनी अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. युवा नेतृत्वाकडे सोपवलेली ही जबाबदारी पाहता, आगामी काळात रावेर तालुक्यात शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढेल असा विश्वास पक्षातील नेत्यांनी व्यक्त केला आहे.


Protected Content

Play sound