
जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद येथील भवानी नगरात राहणाऱ्या एका 35 वर्षीय तरुणाचा बांधकामाच्या साइटवरील पहिल्या मजल्यावरून खाली पडल्याने उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या संदर्भात नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सादिक मेहबूब पिंजारी (वय 35 रा. नशिराबाद ता.जळगाव) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नशिराबाद येथे सादिक पिंजारी हा तरुण आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला होता 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता तो नशिराबाद येथील बांधकाम या ठिकाणी काम करत होता. त्यावेळी त्याचा तोल जाऊन पहिल्या मजल्यावरून तो खाली पडला. त्यामुळे त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. दरम्यान त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान या संदर्भात अखेर चौकशी अंती शुक्रवारी 12 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पो.हे.कॉ. अतुल महाजन हे करीत आहे.



