जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या परप्रांतीय एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने मंगळवार ९ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता काहीतरी अमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आले आहे. या संदर्भात बुधवारी १० सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, उत्तर प्रदेश राज्यातील गाजीपूरा येथील रहिवासी असलेली १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबीयांसह जळगाव शहरातील एका भागात वास्तव्याला आहे. मंगळवारी ९ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास दुकानावर जाते असे सांगून गेली होती. दरम्यान तिला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पीडित मुलीच्या पालकांनी केली. दरम्यान या संदर्भात त्यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार बुधवारी १० सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील करीत आहे.




