Home आरोग्य एम.बी.ए आणि एम.सी.ए नवोदितांसाठी गोदावरी महाविद्यालयात इंडक्शन प्रोग्राम उत्साहात

एम.बी.ए आणि एम.सी.ए नवोदितांसाठी गोदावरी महाविद्यालयात इंडक्शन प्रोग्राम उत्साहात

0
158

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी नव्याने प्रवेश घेतलेल्या एम.बी.ए आणि एम.सी.ए विद्यार्थ्यांसाठी भव्य इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसोबतच व्यावसायिक जगतात यश मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांविषयी मोलाचे मार्गदर्शन देण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके, डॉ. नीलिमा वारके, डॉ. चेतन सरोदे आणि प्रा. चारुशीला चौधरी यांची मंचावर उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचे स्वागत विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. प्रास्ताविकानंतर डॉ. प्रशांत वारके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व्यवस्थापन क्षेत्राची व्याप्ती, यशस्वी व्यवस्थापक होण्यासाठी आवश्यक असणारी दृष्टिकोन आणि सॉफ्ट स्किल्स यांचे महत्त्व स्पष्ट केले.

सरांनी विद्यार्थ्यांना कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याचे आवाहन करत म्हटले की, परीक्षेसाठी केवळ पाठांतर न करता प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रात उपयुक्त ठरणारे कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. एम.बी.ए झाल्यानंतर कोणती स्किल्स उद्योगांना अपेक्षित असतात यावर त्यांनी विस्तृत माहिती दिली. त्याचप्रमाणे, एम.सी.ए पूर्ण केल्यानंतर आयटी क्षेत्रातील करिअर संधी, विविध विभागांतील मागणी आणि इंटरव्ह्यू तयारी याविषयीही त्यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला.

गोदावरी फाउंडेशनची स्थापना, उद्दिष्टे आणि यशाची वाटचाल याबद्दलही त्यांनी थोडक्यात माहिती दिली. सरांनी विद्यार्थ्यांना स्वतः पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि पुढील शैक्षणिक व व्यावसायिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी परदेशी यांनी उत्साहात पार पाडले.


Protected Content

Play sound