Home क्राईम बालक खून प्रकरणात संशयितावर ‘पॉस्को’ कलम वाढवले !

बालक खून प्रकरणात संशयितावर ‘पॉस्को’ कलम वाढवले !

0
235


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरात ६ सप्टेंबर रोजी घडलेल्या सहा वर्षांच्या बालकाच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गुन्ह्यात केवळ खुनाचाच नाही तर लैंगिक अत्याचाराचा समावेश असल्याचा संशय आहे, त्यामुळे पोलिसांनी पॉस्को (POCSO) कायद्यांतर्गत कलम वाढवले आहे.

आरोपीला पोलीस कोठडी, तपासाला गती
यावल शहरात ५ सप्टेंबर रोजी बाबुजीपुरा भागातून बेपत्ता झालेल्या सहा वर्षीय बालकाचा मृतदेह दुसऱ्याच दिवशी शेजारी राहणाऱ्या आरोपी शेख शाहिद शेख बिस्मिल्ला (वय २२) याच्या घरात जळालेल्या अवस्थेत आढळला होता. या प्रकरणी मयत बालकाच्या आजोबांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला १५ सप्टेंबरपर्यंत आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या कोठडीदरम्यान आरोपीने पोपटासारखी माहिती दिल्याने तपासाला नवी दिशा मिळाली.

शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासे
पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मसलोद्दीन शेख आणि त्यांच्या पथकाने कसून तपास केला. यावल ग्रामीण रुग्णालयात झालेल्या बालकाच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक बाबी समोर आल्या. या अहवालानुसार, हा खून अनैसर्गिक संबंधातून झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या खुलाशाने या गुन्ह्याचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जात असून, या गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग आहे का? याचाही शोध घेत आहेत. या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.


Protected Content

Play sound