पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव-छत्रपती संभाजीनगर हायवेवर वाकोद गावाजवळ सिंहगड हॉटेलसमोर एक भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव ट्रकने अचानक लेन बदलल्याने त्याच्या मागील इको कारची धडक बसली. या अपघातात सियानीबाई रेत्या बारेला या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पहूर पोलीस स्टेशनमध्ये ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रकच्या अचानक लेन बदलाने अपघात
फिर्यादी लखन हुकमचंद मालवीय हे हा अपघात ६ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजता आपली मारुती सुझुकी इको (क्र. MP ०९ ZM ०८३६०) गाडी घेऊन जात होते. त्यांच्या पुढे ट्रक (क्र. MH १८ BG ६६६६) जात होता, ज्याचा चालक सईद खान खानन्याज खानन होता. सईद खानने आपला ट्रक हलगर्जीपणाने आणि भरधाव वेगाने चालवला. तो डाव्या बाजूने जात असताना अचानक त्याने उजवीकडे लेन बदलली. यामुळे लखन मालवीय यांच्या कारचा ट्रकच्या मागील बाजूस धक्का लागून त्यांची गाडी रस्त्याच्या डिव्हायडरवर आदळली.

जखमींना रुग्णालयात दाखल
या अपघातात इको कारचे मोठे नुकसान झाले. गाडीत बसलेल्या प्रदीप बारेला, मुक्तीलाल ब्राम्हणे, मगन बारेला, राजिया बारेला, आणि राम मालवीय यांना गंभीर दुखापत झाली. तर सियानीबाई रेत्या बारेला यांना प्राण गमवावे लागले. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला. या प्रकरणाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक प्रमोद कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील हे करीत आहे.



