Home Uncategorized ‘जान्हवी’ हॉटेलसमोर रात्रीचा राडा; एका तरूणाला गंभीर मारहाण !

‘जान्हवी’ हॉटेलसमोर रात्रीचा राडा; एका तरूणाला गंभीर मारहाण !

0
336

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील भुसावळ रोडवरील हॉटेल जान्हवी समोर हॉटेलच्या बिलावरून सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करणाऱ्या निलेश दिलीप पाटील (वय ४० रा. कुसुंबा ता.जळगाव) या तरूणाला अनोळखी ४ ते ५ जणांनी काचेची बॉटल आणि स्टीलच्या जगने बेदम मारहाण केली. या घटनेत निलेश पाटील गंभीर जखमी झाले असून, या प्रकरणी सोमवारी ८ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘काय कुटाणे करता’ म्हणणे पडले महागात
७ सप्टेंबर रोजी मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास घडली. फिर्यादी निलेश पाटील हॉटेल जान्हवीसमोरून जात असताना त्यांनी पाहिले की, काही तरुण हॉटेलच्या मॅनेजरसोबत बिलावरून वाद घालत आहेत. हा वाद पाहून निलेश पाटील यांनी त्यांना ‘काय कुटाणे करता?’ असे विचारले. हे शब्द ऐकून आरोपींचा राग अनावर झाला. त्या चार-पाच तरुणांनी निलेश पाटील यांच्यावर हल्ला केला. त्यांनी काचेची बॉटल आणि स्टीलच्या जगने त्यांच्या तोंडावर मारहाण केली. मारहाणीत निलेश खाली पडल्यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनीही मारले.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
मारहाणीनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. निलेश पाटील यांच्यावर उपचार सुरू असून, या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेका शशिकांत पाटील करत आहेत.


Protected Content

Play sound