जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कांताई नेत्रालय जवळ भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिला जखमी झाल्याची घटना शुक्रवारी ५ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रविवारी ७ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात कारवरील अनोळखील महिला चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निता महेंद्र पाटील वय ३९ रा. जुनी पोलीस लाईन, रेणुका नगर, जळगाव या महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. शुक्रवारी ५ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता कांताई नेत्रालयकडून त्यांच्या दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीए ५५९१) ने जात असतांना समोरून येणारी कार क्रमांक (एमएच १९ सीझेड ६६१०) ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत निता पाटील या महिला गंभीर जखमी झाल्या. तसेच त्यांच्या वाहनाचेही मोठे नुकसान झाले. याप्रकरणी रात्री १० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलीस ठाण्यात कारवरील अनोळखी महिला चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय निकम हे करीत आहे.




