Home Cities यावल यावल मराठा सेवा संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर

यावल मराठा सेवा संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर

0
197

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील खरेदी-विक्री संघात तालुका मराठा सेवा संघाची वार्षिक बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत मराठा सेवा संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या प्रसंगी राज्याचे उपाध्यक्ष शिवश्री सुरेंद्र पाटील, नाशिक विभागीय अध्यक्ष रामदादा पवार, विभागीय उपाध्यक्ष सुमित पाटील आणि जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांच्या उपस्थितीत नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली.

अध्यक्षपदी अजय पाटील, सचिवपदी अरुण यादव यांची निवड
या बैठकीत जुन्या कार्यकारिणीचा आढावा घेत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तालुकाध्यक्षपदी अजय पाटील यांची तर सचिवपदी अरुण यादव यांची पुन्हा निवड कायम ठेवण्यात आली. तसेच, उद्योग कक्षाच्या कार्याध्यक्षपदी दीपक चव्हाण सर आणि उपाध्यक्षपदी अमोल खैरनार यांची निवड करण्यात आली. त्यांना तालुका कार्यकारिणी पूर्ण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

जिल्हा आणि राज्य पातळीवरील नियुक्त्या
मराठा सेवा संघाच्या राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून धनराज पाटील सर यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच, जिल्हा उपाध्यक्ष म्हणून श्रीकांत मोटे आणि नायगाव येथील संदीप पाटील सर यांची संयुक्त उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. जिल्हा संघटक म्हणून बी.डी. पाटील यांना नियुक्त करण्यात आले. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली.

समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
या बैठकीला यावल खरेदी-विक्री संघाचे संचालक अतुल पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत खरेदी संघाचे संचालक तेजस पाटील, नायगावचे माजी सरपंच व्ही.एल. पाटील, आर.ई. पाटील, देवकांत पाटील, सुनील गावडे, रेल्वे विभागाचे सल्लागार बापू जासूद, प्रमोद पाटील, योगेश पाटील, भैय्या पाटील, विनोद पाटील, कृष्णा पाटील, स्वप्नील बोरसे, एम.पी. चव्हाण सर, जिजाबराव पाटील आणि रवींद्र टोंगळे आदी उपस्थित होते. या बैठकीत राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.


Protected Content

Play sound