Home Uncategorized कारण नसतांना तरूणाला लोखंडी पाईपाने बेदम मारहाण !

कारण नसतांना तरूणाला लोखंडी पाईपाने बेदम मारहाण !

0
181

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आदर्श नगर येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या समोर काहीही कारण नसतांना एका तरूणाला अनोळखी ४ जणांनी तोंडाला रूमाल बांधून शिवीगाळ करत लोखंडी पाईपाने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. याप्रकरणी गुरूवारी ४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अनोळखी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमेर सलीम पटेल वय २५ रा. रजा कॉलनी, जळगाव हा तरूण बुधवारी ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आदर्श नगरातील दुय्यक निबंधक कार्यालयाच्या समोर उभा असतांना त्याठिकाण चार अनोळखी तोंडाला रूमाल बांधून आले होते. त्यांनी काहीही कारण नसतांना उमेर पटेल याला शिवीगाळ करत लोखंडी पाईपाने पायावर आणि डोक्यावर मारहाण करून गंभीर दुखापत केली. त्यानंतर ते पसार झाले. याप्रकरणी उमेर पटेल याने जवळच्या रामानंद नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुरूवारी ४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ ज्ञानेश्वर पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound