Home क्राईम गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला अटक; एमआयडीसी पोलीसांची कारवाई

गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला अटक; एमआयडीसी पोलीसांची कारवाई

0
285

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुसुंबा शिवारात, विमानतळाजवळ असलेल्या दोस्ती पान सेंटरसमोर आरोपी हातात पिस्तूल घेऊन दहशत माजवत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी ३० ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता केलेल्या धडक कारवाईत एका तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शनीवारी ३१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी रचला यशस्वी सापळा
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना कुसुंबा शिवारात एका व्यक्तीने गावठी कट्टा बाळगला असल्याची माहिती मिळाली. पोलीस कॉन्स्टेबल राहुल घंटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ३० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ९.३० वाजता तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. छत्रपती संभाजीनगर रोडवरील दोस्ती पान सेंटरसमोर पोलिसांनी सापळा रचला आणि संशयित व्यक्तीवर लक्ष ठेवले.

आरोपीला अटक, शस्त्र जप्त
पोलिसांनी संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले असता, त्याच्याकडे एक सोनेरी रंगाचा गावठी कट्टा आढळला. या कट्ट्याला मॅगझीन असून, चॉकलेट रंगाची ग्रिप आणि मध्यभागी काळ्या रंगाचा स्टारचे डिझाइन आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, त्याने आपले नाव अमोल सुरेश खैरनार (वय २८, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून १ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त केला आहे. जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी शस्त्रबंदीचे आदेश दिले असतानाही आरोपीने हे शस्त्र बेकायदेशीरपणे बाळगले होते.

आर्म अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल घंटे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, आरोपी अमोल खैरनार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार रामदास कुंभार करत आहेत.


Protected Content

Play sound