Home Cities जळगाव लकी टेलर यांचा पुन्हा ‘गेम’ : बाजार समिती सभापतीपदी सुनील महाजन !

लकी टेलर यांचा पुन्हा ‘गेम’ : बाजार समिती सभापतीपदी सुनील महाजन !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी आज ऐन वेळेस लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी टेलर यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. तथापि, माजी उपमहापौर सुनील महाजन यांनी मतदानाच्या प्रसंगी बाजी पलटवली. यामुळे पुन्हा एकदा ‘लकी’ टेलर हे ‘अनलकी’ ठरल्याचे दिसून आले.

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मध्यंतरी अविश्वास प्रस्तावाचे नाट्य चांगलेच रंगले. सभापती शामकांत सोनवणे यांच्या विरोधात अठरापैकी तब्बल चौदा सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. लागलीच हे सर्व सदस्य सहलीवर देखील गेले होते. तर, अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाण्याआधीत शामकांत सोनवणे यांनी आपल्या सभापतीपदाचा राजीनामा दिला होता. यामुळे रिक्त झालेल्या पदावरील जागेसाठी आज बाजार समितीत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले.

या निवड प्रक्रियेत सभापतीपदासाठी सुनील महाजन, मनोज दयाराम चौधरी व लक्ष्मण गंगाराम पाटील यांनी अर्ज घेतले. तर उपसभापतीपदासाठी गोकुळ चव्हाण यांनी एकमेव अर्ज घेतला. यात सभापतीपदासाठी मनोज चौधरी यांनी आपला अर्ज मागे घेतला. यामुळे सुनील महाजन विरूध्द लक्ष्मण पाटील असा सामना रंगला. यात हात उंचावून मतदान घेण्यात आले. यामध्ये सुनील महाजन यांना 15 तर लक्ष्मण पाटील यांना अवघी दोन मते मिळाली. यामुळे पुन्हा एकदा लकी टेलर यांना सभापतीपदाने हुलकावणी दिल्याचे दिसून येत आहे.

तर निवड जाहीर होताच दोन्ही मान्यवरांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.


Protected Content

Play sound