Home क्राईम बसस्थानकातून वृध्दाचा मोबाईल चोरणाऱ्याला अटक !

बसस्थानकातून वृध्दाचा मोबाईल चोरणाऱ्याला अटक !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बस स्थानकातील बसमधून मंगल मुलचंद पाटील (वय ६३, रा. पाडळसरे, ता. अमळनेर) यांचा मोबाईल चोरणाऱ्या गौररव जगन कोळी (वय २२, रा. गेंदालाल मिल) याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही घटना सोमवारी २५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली. याप्रकरणी दुपारी अडीच वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील पाडळसरे गावात मंगल मुलचंद पाटील हे वास्तव्यास आहे. सोमवारी २५ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास दोंडाईचा अमळनेर मार्गे जाणाऱ्या बसमधून प्रवास करीत होते. नवीन बसस्थानकात ही बस आली असता, बममधून गौरव कोळी या चोरट्याने त्यांच्या खिशातून साडेपाच हजारांचा मोबाईल चोरुन नेला. दरम्यान, ही घटना लक्षात येताच पोलिसांनी संशयित गौरव कोळी या चोरटयाला अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोहेकॉ नरेश सोनवणे हे करीत आहे.


Protected Content

Play sound