Home Cities अमळनेर विषारी औषध सेवन केल्याने वृध्दाचा मृत्यू

विषारी औषध सेवन केल्याने वृध्दाचा मृत्यू


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील डांगर गावात राहणाऱ्या एका वृद्धाने विषारी औषध घेतल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बाबू बाला सोनवणे (वय 89 रा. डांगर ता. अमळनेर) असे मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील डांगर गावात बाबू सोनवणे हे वृद्ध आपल्या कुटुंबीयासह वास्तव्याला होते. दरम्यान 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता त्यांनी शेतात विषारी औषध सेवन केले होते त्यामुळे त्यांचे प्रकृती खालावली त्यांना तातडीने अमळनेर येथील खाजगी रुग्णात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान यासंदर्भात शुक्रवारी 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहे.


Protected Content

Play sound