Home मनोरंजन तर अंडरटेकर ठरणार सर्वाधिक मानधन घेणारा सेलिब्रिटी

तर अंडरटेकर ठरणार सर्वाधिक मानधन घेणारा सेलिब्रिटी


मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। सलमान खानचा लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ यंदा आपल्या 19व्या सिझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, यंदाचा हंगाम केवळ भारतीय सेलिब्रिटीपुरता मर्यादित नसून आंतरराष्ट्रीय स्तरावरही गाजलेल्या नावांमुळे तो इतिहास घडवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. बिग बॉस 19 मध्ये WWE सुपरस्टार ‘द अंडरटेकर’ आणि बॉक्सिंग लेजेंड ‘माईक टायसन’ यांच्या सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात असून, या दोघांची एन्ट्री शोला वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, बिग बॉसच्या निर्मात्यांनी अंडरटेकरशी प्राथमिक स्तरावर संपर्क साधला आहे. सर्व काही ठरल्यानंतर तो नोव्हेंबर महिन्यात 7 ते 10 दिवसांसाठी बिग बॉसच्या घरात पाहुणा म्हणून दिसू शकतो. अंडरटेकरची उपस्थिती काही काळासाठी असली, तरी त्याचा प्रभाव आणि ग्लॅमर शोसाठी जबरदस्त ठरणार आहे. त्याचप्रमाणे, जर अंडरटेकर सहभागी झाला, तर तो या सीझनमधील सर्वाधिक मानधन घेणारा सेलिब्रिटी ठरू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

यापूर्वी बिग बॉसच्या चौथ्या सिझनमध्ये डब्ल्यूडब्ल्यूई स्टार द ग्रेट खली सहभागी झाला होता आणि उपविजेता ठरला होता. त्याला त्यावेळी दर आठवड्याला तब्बल ५० लाख रुपये मानधन मिळाले होते. त्यामुळे, अंडरटेकर जर एक आठवडा किंवा त्याहून अधिक काळ घरात राहिला, तर तो बिग बॉसच्या इतिहासातील सर्वात महागडा स्पर्धक ठरण्याची शक्यता आहे.

फक्त अंडरटेकरच नाही, तर माईक टायसनच्या सहभागाची शक्यताही चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिग बॉस 19 च्या निर्मात्यांनी टायसन व त्यांच्या टीमसोबत बोलणी सुरू केली असून, सर्व काही आलबेल झाल्यास टायसन ऑक्टोबर महिन्यात एक आठवडा किंवा १० दिवस बिग बॉसच्या घरात राहू शकतो. सध्या टायसनच्या मानधनाबाबत चर्चा सुरू आहे आणि लवकरच अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बिग बॉस 19 चा प्रीमियर 24 ऑगस्ट 2025 रोजी कलर्स टीव्ही आणि जिओ हॉटस्टारवर प्रसारित होणार आहे. शोची सुरूवातच एवढ्या मोठ्या एन्ट्रींसह होत असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यंदाचा सिझन हा बिग बॉसच्या इतिहासातील सर्वात भव्य आणि चर्चेचा विषय ठरणार आहे. अशी माहितीही समोर आली आहे की शो पुढील वर्षी फेब्रुवारी 2026 मध्ये संपेल.


Protected Content

Play sound