Home Uncategorized जळगाव विमानतळावर अँटी-हायजॅक; सुरक्षा यंत्रणेची यशस्वी मॉक-ड्रिल !

जळगाव विमानतळावर अँटी-हायजॅक; सुरक्षा यंत्रणेची यशस्वी मॉक-ड्रिल !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत, जळगाव विमानतळावर गुरूवारी २१ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता अँटी-हायजॅक मॉक-ड्रिल यशस्वीरित्या पार पडला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाचा सराव आयोजित करण्यात आला होता. या सरावाचा मुख्य उद्देश आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर प्रतिसाद, विविध यंत्रणांमधील उत्कृष्ट समन्वय आणि सुरक्षात्मक उपाययोजना अधिक परिणामकारक करणे हा होता.

यावेळी विमानतळ संचालक हर्षकुमार त्रिपाठी, एटीसी अधिकारी नवीन आर्या, श्रुती मेश्राम, संचार अधिकारी सुरेश बसंतदाणी, एमएसएफ प्रमुख मुसोद्दीन शेख, तसेच विमानतळ मुख्य सुरक्षा अधिकारी शुभम महाल्‍ले यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या मॉक-ड्रीलमुळे सुरक्षा यंत्रणा, पोलीस दल, विमानतळ प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील संवाद आणि प्रतिसाद क्षमता तपासली गेली. या सरावामध्ये क्विक रिस्पॉन्स टीम (जळगाव जिल्हा पोलीस), एमआयडीसी पोलीस ठाणे, जळगाव शहर महानगरपालिका अग्निशमन दल आणि १०८ इमर्जन्सी मेडिकल रिस्पॉन्स सर्व्हिसचा प्रभावी सहभाग दिसून आला. प्रत्येक विभागाची भूमिका आणि कार्यक्षमतेची या निमित्ताने चाचणी झाली.

ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा मॉक-ड्रील राबविण्यात आला. अशा सरावांमुळे विमानतळाची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होते आणि नागरिकांचा आत्मविश्वास वाढतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कोणत्याही संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी आपली यंत्रणा पूर्णपणे तयार आहे, हा संदेश या यशस्वी सरावाने दिला आहे.

ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घेण्यात आलेल्या या मॉक-ड्रिलमुळे विमानतळ सुरक्षा व्यवस्थेत अधिक मजबुती येणार असून प्रवाशांचा आत्मविश्वास वाढणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.


Protected Content

Play sound