Home Uncategorized अडावदच्या कामधेनू संस्थेकडून दूध उत्पादकांना १२ लाखांचा बोनस वाटप!

अडावदच्या कामधेनू संस्थेकडून दूध उत्पादकांना १२ लाखांचा बोनस वाटप!

0
215


अडावद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील अडावद येथील कामधेनू दुग्धोत्पादक सहकारी संस्थेने आपल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी तब्बल १२ लाख रुपयांचा बोनस वाटप केला आहे. यामुळे वर्षभर संस्थेला दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

ज्या शेतकऱ्यांनी वर्षभर नियमितपणे दूध पुरवठा केला, त्यांना या बोनसचा लाभ मिळाला आहे. यामध्ये म्हशीच्या दुधासाठी प्रति लिटर १.८५ पैसे तर गायीच्या दुधासाठी प्रति लिटर ५० पैसे याप्रमाणे बोनस वाटप करण्यात आले. दोन्ही दुधाच्या प्रकारांसाठी मिळून एकूण ११ लाख ९५ हजार २२८ रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या हातात पडली आहे. विशेष म्हणजे, इतका बोनस वाटप करूनही संस्थेला १७ लाख ७३ हजार ८५ रुपये इतका नफा झाला आहे, हे संस्थेच्या यशस्वी कामकाजाचे द्योतक आहे.

यावेळी संस्थेने सर्वात जास्त दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना दुधाची कॅन आणि तगारी (परात) देऊन गौरविले. संस्थेच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याबरोबरच त्यांना प्रोत्साहनही मिळत आहे. कामधेनू संस्थेच्या या पावलामुळे स्थानिक दूध उत्पादकांना मोठा आधार मिळाला असून, दूध व्यवसायाला चालना मिळाली आहे.


Protected Content

Play sound