Home Cities जळगाव सतरा मजली इमारतीसमोर ‘निष्ठा २०२५’ दहीहंडीचा थरार; युवासेनेचा जल्लोष

सतरा मजली इमारतीसमोर ‘निष्ठा २०२५’ दहीहंडीचा थरार; युवासेनेचा जल्लोष


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवसेना प्रणित युवासेनेने आज जळगावात ‘निष्ठा २०२५’ ही दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली. शहरातील सतरा मजली इमारतीसमोर दरवर्षीप्रमाणे यंदाही हा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला, जो युवासेनेच्या निष्ठा दहीहंडी उत्सवाचे तिसरे वर्ष होते.

या दहीहंडी उत्सवासाठी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाप्रमुख पीयूष गांधी, विशाल वाणी, अमित जगताप, हर्षल मुंडे, अंकित कासार, सौरभ चौधरी, गजेंद्र कोळी आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे हा उत्सव भव्यदिव्य स्वरूपात पार पडला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे उपनेते गुलाबरावजी वाघ, जिल्हा संघटक करण पवार, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, माजी महापौर राखी सोनवणे, माजी नगरसेविका ज्योती तायडे, युवासेना विस्तारक प्रवीण चव्हाण, भूषण मुलाने, सपना चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली. गोविंदा पथकांनी थरावर थर लावत दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला, तर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना प्रोत्साहन दिले. या उत्सवातून युवासेनेने आपली संघटनात्मक ताकद आणि एकोपा पुन्हा एकदा दाखवून दिला.


Protected Content

Play sound