Home राजकीय सावद्यातील एक मातब्बर व्यक्तिमत्व लवकरच अजित पवार गटात

सावद्यातील एक मातब्बर व्यक्तिमत्व लवकरच अजित पवार गटात


सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सावदा शहराच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात एक मोठी घडामोड घडणार असून, शिक्षणक्षेत्रात आपली वेगळी छाप पाडणाऱ्या व व्यवसायिक क्षेत्रात यशस्वी असलेल्या एका नामांकित व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या शेकडो समर्थकांचा १७ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) मध्ये औपचारिक प्रवेश होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत हा ऐतिहासिक प्रवेश पार पडणार आहे, अशी विश्वसनीय माहिती समोर आली आहे.

या प्रभावशाली नेतृत्वाने आतापर्यंत स्थानिक राजकारणात तटस्थ भूमिका घेतली होती, मात्र आता त्यांनी थेट सक्रिय राजकारणात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतल्याने संपूर्ण सावदा शहरात आणि परिसरात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विविध सामाजिक, शैक्षणिक आणि रोजगाराभिमुख उपक्रमांमध्ये सक्रीय असलेला हा गट स्थानिक पातळीवर ठोस कामगिरीसाठी ओळखला जातो. त्यांच्या कार्यामुळे अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून, ग्रामीण भागातील शिक्षणाचा स्तर उंचावण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाने कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला असता, तो त्या पक्षासाठी गेमचेंजर ठरू शकतो हे यापूर्वीच स्पष्ट झाले होते.

१७ ऑगस्ट रोजी होणारा हा प्रवेश केवळ एक औपचारिकता न राहता, एकप्रकारचे शक्तिप्रदर्शनच ठरणार आहे. या दिवशी सावदा व परिसरातील शेकडो कार्यकर्ते, समर्थक, विद्यार्थी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या नेतृत्वाच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवतील, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

सावदा शहरातील राजकीय रंगमंचावर हा प्रवेश नवा अध्याय उघडणारा ठरणार असून, अनेक नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात यानंतर होण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाच्या स्थानिक संघटनेला यामुळे मोठा बळकटी मिळेल, असे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केले जात आहे.


Protected Content

Play sound