Home Uncategorized उज्वल निकम यांच्या खासदारकीला आव्हान : असीम सरोदे यांची नोटीस !

उज्वल निकम यांच्या खासदारकीला आव्हान : असीम सरोदे यांची नोटीस !


मुंबईलाईव्ह ट्रेंडस न्यूज  वृत्तसेवा।  ॲड. उज्वल निकम हे अनेक प्रकरणांमध्ये सरकारी वकील असल्याने ते राज्यसभा सदस्यपदासाठी अपात्र आहेत, असा दावा करत विधीज्ज्ञ असीम सरोदे यांनी विधी व न्याय विभागासह राज्यसभा सचिवालयाला नोटीस बजावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

जळगावचे सुपुत्र तथा ख्यातनाम विधीज्ज्ञ ॲड. उज्वल निकम यांची अलीकडेच राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नामनिर्देशीत सदस्य म्हणून नियुक्ती केली असून सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी आपल्या पदाची शपथ देखील घेतली आहे. मात्र ते या पदावर काम करण्यास अपात्र असल्याचा दावा ॲड. असील सरोदे यांनी केला आहे. त्यांनी विधी व न्याय विभाग तसेच राज्यसभा सचिवालयास नोटीस पाठविली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, उज्वल निकम हे सध्या 24 ते 29 प्रकरणांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहत आहेत. यामुळे ते एकाच वेळी विशेष सरकारी वकील आणि राज्यसभा सदस्य म्हणून काम पाहू शकतात का ? अशी विचारणा त्यांनी नोटीसीत केली आहे.

या संदर्भात असीम सरोदे म्हणाले की, राज्यसभा सदस्य बनल्यानंतर उज्वल निकम हे क्षण देखील सरकारी वकील म्हणून काम पाहू शकत नाहीत. त्यांनी असे केले त्ो तात्काळ अपात्र ठरतील असा दावा देखील सरोदे यांनी केला आहे. तसेच त्यांनी या प्रकरणी राज्याच्या महाधिवक्त्यांना देखील या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. यामुळे आता असीम सरोदे यांच्या नोटीसीवर नेमके काय उत्तर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound