Home Uncategorized अश्लिल चाळे करत महिलेचा विनयभंग; संशयिताला अटक

अश्लिल चाळे करत महिलेचा विनयभंग; संशयिताला अटक


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी ११ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी १२ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. भास्कर सुकदेव पाटील रा. धानवड ता.जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील धानवड गावातील एका भागात ४४ वर्षीय महिला वास्तव्याला आहे. सोमवारी ११ ऑगस्ट रात्री ९.३० वाजता महिला घरी एकट्या असतांना संशयित आरोपी भास्कर पाटील हा महिलेच्या घरात घुसून अश्लिल चाळे करत त्यांचा विनयभंग केला. त्यानंतर तो पसार झाला. याबाबत महिलेने मंगळवारी १२ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच संशयित आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोहेकॉ मुकुंदा पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound