Home क्राईम दुकानाचे बांधकाम केल्यावरून वृध्दाला लोखंडी सळईने मारहाण

दुकानाचे बांधकाम केल्यावरून वृध्दाला लोखंडी सळईने मारहाण


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील फातेमा नगरात घराच्या बाहेर दुकानाचे बांधकाम केल्याच्या कारणावरून एका वृध्दाला शिवीगाळ करत लोखंडी सळई डोक्यात टाकून गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी ११ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजता घडली आहे. याबाबत रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अस्लम अब्दुल नवी पटवे वय ६१ रा. फातेमा नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांच्या घराच्या बाहेर दुकानाचे बांधकाम केले आहे. या कारणावरून सोमवारी ११ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजता त्यांच्या घराच्या शेजारी राहणारे इकबाल शेख, जावेद इकबाल शेख आणि समीर इकबाल शेख या तिघांनी अस्लम अब्दुल नबी पटवे यांना शिवीगाळ करत लोखंडी सळई डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली आणि धमकी दिली. याप्रकरणी रात्री १० वाजता इकबाल शेख, जावेद इकबाल शेख आणि समीर इकबाल शेख तिघे राहणार फातेमा नगर, जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound