Home राजकीय रेशन दुकानदारांच्या मनमानी कारभार; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निवेदन !

रेशन दुकानदारांच्या मनमानी कारभार; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निवेदन !


सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील काही परवानाधारक रेशन दुकानदार नियमानुसार दुकाने चालवत नसल्याने गोरगरीब नागरिकांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आवाज उचलला असून, आज त्यांनी नायब तहसीलदार संजय तायडे यांना निवेदन सादर केले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रावेर तालुकाध्यक्ष अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदनात म्हटले आहे की, काही रेशन दुकानदार महिन्यात केवळ चार ते पाच दिवसच रेशन वाटप करतात आणि उर्वरित दिवस दुकान बंद ठेवतात. यामुळे बाहेरगावी असलेले किंवा वेळेवर दुकानात पोहोचू न शकलेले अनेक नागरिक शासनाच्या धान्यापासून वंचित राहत आहेत. यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रेशन दुकानांच्या या अनियमिततेमुळे गरजू लोकांपर्यंत धान्याचा लाभ वेळेवर पोहोचत नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, नियमभंग करणाऱ्या अशा रेशन दुकानदारांवर तात्काळ कार्यवाही करावी आणि जनतेला वेळेत व योग्य पद्धतीने धान्याचा लाभ मिळेल याची हमी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे. यावेळी मयूर कावडकर, प्रशांत पाटील, योगेश सोनवणे, ललित महाजन, जीवन पाटील, सोहम तुळस्कर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशासनाने यावर तातडीने लक्ष घालून गोरगरिबांना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound