नागपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। बहुप्रतिक्षित नागपूर ते पुणे या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला असून हा ऐतीहासीक क्षण मानला जात आहे. जिल्ह्यात भुसावळ व जळगावला या ट्रेनचा थांबा असणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून नागपूर ते पुणे या दोन महत्वाच्या शहरांना जोडणाऱ्या वंदे भारत एक्स प्रेस बाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. यामुळे या दोन्ही शहरांमधील प्रवास हा सुमारे तीन तास अधिक जलद गतीने होणार आहे. जळगाव जिल्ह्याचा विचार केला असता या ट्रेनला भुसावळ आणि जळगाव येथे थांबा मिळालेला आहे. यामुळे जिल्ह्यातील जनतेची नागपूर आणि पुणे या दोन्ही शहरांची कनेक्टीव्हिटी वाढण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळूरू येथून या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखविला. ही ट्रेन आजपासून सुरू होणार असून यात बसण्यासाठी प्रवासी उत्सुक झाले आहेत. आज प्रत्येक रेल्वे स्थानकावर वंदे भारतचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार असून यात जळगाव आणि भुसावळ यांचा देखील समावेश आहे.



