Home क्राईम कौटुंबिक वाद : तरूणासह त्यांच्या कुटुंबाला मारहाण !

कौटुंबिक वाद : तरूणासह त्यांच्या कुटुंबाला मारहाण !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील आझाद नगर परिसरात कौटुंबिक वादातून एका तरुणासह त्याच्या कुटुंबातील सदस्यांना चार जणांनी शिवीगाळ करत चाकू आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना ५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता घडली. याप्रकरणी बुधवारी ६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १.३० वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इजाज मुस्ताक खाटीक (वय २५, रा. आझाद नगर) हा तरुण रंगकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. ५ ऑगस्ट रोजी दुपारी तो घरी असताना कौटुंबिक वादातून शेजारी राहणारे आवेश खाटीक, सोनू खाटीक, शकील खाटीक आणि अरबाज खाटीक यांनी इजाज, त्याची आई, वडील, भाऊ आणि बहिणीला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी एकाने चाकूने तर इतरांनी लाकडी दांडक्याने मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर इजाज खाटीक याने रामानंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मारहाण करणाऱ्या चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र कोळी करत आहेत.


Protected Content

Play sound