रावेर, प्रतिनिधी | निसर्गाचा समतोल राखायाचा तर त्यासाठी वृक्ष जगविणे गरजेचे आहे. तसेच प्रशासनाने वृक्ष लागवडीसाठी केलेले परिश्रम चांगले असून प्रत्येकाने वृक्ष लागवडीबाबत जनजागृती करण्याची गरज असल्याचे आवाहन रावेर नगर पालिकेचे मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांनी आज (दि.१७) येथे केले.
येथील न्यायालयाच्या आवारात आज वृक्ष लागवड करण्यात आली, त्यावेळी रावेर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आर.एल. राठोड, सह न्यायाधीश आर.एम. लोडगे, यांची प्रमुख उपस्थिती होती. वकील संघाचे अध्यक्ष अॅड.विनोद कोघे, उपाध्यक्ष अॅड.जगदीश महाजन, सचिव अॅड.बी.डी. निळे, सहसचिव अॅड.धनराज पाटील, अॅड.एस.एस. सैय्यद, अॅड. एम. बी. चौधरी, अॅड.विपीन गडे, अॅड.जयंत तिवारी, अॅड. आर.एन. चौधरी, अॅड.संदीप भंगाळे, अॅड. सुभाष धुंदले, अॅड. सुदाम सांगळे, अॅड.शितल जोशी, अॅड.प्रमोद विचवे, अॅड.विद्या सोनार, अॅड.किशोर पाटील, अॅड.मिलिंद पाटील, अॅड.राकेश पाटील, अॅड.एल.के. शिंदे, अॅड.संदीप मेढे, अॅड.आर.ए. पाटील, अॅड.तुषार माळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड.योगेश गजरे यांनी केले तर आभार अॅड.जितेंद्र दांडगे यांनी मानले.