भुसावळ प्रतिनिधी । वळणावर चालकाचा ताबा सुटून ट्रक उलटल्याची घटना बुधवारी सकाळी 5 वाजेच्या सुमारास साक्री टोलनाका जवळ घडली. घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, बैथूर येथील आरएसके कंन्स्ट्रक्शन कंपनीचा ट्रक क्रमांक (एमएच 48 एच 1061) ने सिमेंट घेण्यासाठी बऱ्हाणपुर येथून नशिराबाद येथे जात असतांना सकाळी 5 ते 6 वाजेच्या दरम्यान साक्री टोलनाका येथील वळणावर ट्रकवरील गाडीवरील ताबा सुटल्याने ट्रक उलटली. यात प्रसंगावधानाने चालकाने ट्रक मधून उडी घेतली होती. यात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. सकाळी 6 वाजता झालेली घटनेनंतर पोलीसात अद्यापर्यंत कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.