अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील करणखेडा येथील माहेर असलेल्या विवाहितेला माहेरून पैशांची मागणी करत सासरी बासर येथे शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. केल्याप्रकरणी मारवड पोलीस स्टेशनमध्ये पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २९ मे २०२१ पासून ते जानेवारी २०२५ पर्यंत बासर, ता. साक्री, जि. धुळे येथील सासरी वेळोवेळी घडली. आरती राजेंद्र सोनवणे (वय २३ वर्षे, रा. बासर, ता. साक्री, जि. धुळे, ह.मु. मुडी, पो.स्ट. करणखेडा, ता. अमळनेर, जि. जळगाव) यांनी याबाबत ३० जुलै २०२५ रोजी दुपारी १२.२५ वाजता तक्रार दिली. त्यानुसार पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करणखेडा येथील माहेर असलेल्या आरती राजेंद्र सोनवणे (वय २३) यांचा विवाह धुळे जिल्ह्यातील बासर येथील राजेंद्र संतोष भिल यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. विवाहिता ही सासरी नांदत असताना, वेळोवेळी तिला माहेरहून पैसे आणावे अशी मागणी करण्यात आली. विवाहितेचे पैसे आणले नाही म्हणून शिवीगाळ, मारहाण केली आणि तिचा शारीरिक तसेच मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून आरतीने अखेर पोलिसांत धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पती राजेंद्र संतोष भिल, सासू बानू संतोष सोनवणे, सासरे संतोष विक्रम सोनवणे,, ननंद वर्षा सोनवणे, ननंद मनीषा धनराज पवार आणि नंदोई भाऊ धनराज शिवाजी पवार (सर्व रा. बासर, ता. साक्री, जि. धुळे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील हे करीत आहे.




