Home अर्थ श्रीसंत ज्ञानेश्वर विद्यालयात वृक्षारोपण सोहळा

श्रीसंत ज्ञानेश्वर विद्यालयात वृक्षारोपण सोहळा


जळगाव– लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील  ‘सहयोग मल्टीस्टेट को-ऑपरेटीव सोसायटी’ने आज समाजोपयोगी उपक्रम राबवताना श्रीसंत ज्ञानेश्वर पूर्व प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण सोहळा साजरा केला. ११% व्याजदर देणाऱ्या या विश्वसनीय संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या वृक्षारोपण सोहळ्याच्या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक, शिक्षिका साधना शिरसाठ आणि ‘सहयोग’ शाखेचे प्रमुख प्रतिनिधी अनिल ओशी, किरण सुरवाडे, प्रशांत मुजुमदार, अमेश चव्हाण, कल्पेश माळी आणि कल्पेश बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण करत विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व सांगितले. या उपक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण सहभाग लक्षवेधी ठरला.

संस्थेच्या शाखा प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पर्यावरणाची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकाची असल्याचे सांगितले. वृक्षलागवडीच्या माध्यमातून प्रदूषण नियंत्रण, जलसंधारण आणि जैवविविधतेचे रक्षण शक्य आहे, हे उदाहरणांद्वारे समजावण्यात आले. कार्यक्रमानंतर शाळा परिसरात विविध प्रकारची फळझाडे व छायादायक झाडे लावण्यात आली.

शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी ‘सहयोग’च्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत, अशा संस्थांनी शिक्षण क्षेत्रातही योगदान द्यावे, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेच्या प्रतिनिधींना शाळेकडून  धन्यवाद देण्यात आले.


Protected Content

Play sound