जळगाव । जिल्हा परिषदेचे नूतन सीईओ डॉ. बी.एन. पाटील यांनी विविध विभागांचा आढावा घेत चुकार कर्मचार्यांवर कारवाईचे संकेत दिले आहेत.
घरकुलांचे काम पूर्ण झाल्यावर त्याचे जिओ टॅगिंग करणे ही ग्रामपंचायतीला बंधनकारक आहे. मात्र हे काम मोठ्या प्रमाणात रखडले आहे. यासह दोन ते तीन वर्षातील जीपीडीपी आराखडेही अपलोड केलेले नाहीत. ही सर्व कामे येत्या १९ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचा अल्टीमेट दिला असून ज्या ग्रामपंचायतीचे काम पूर्ण होणार नाही, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिले आहे.
सीईओ डॉ. पाटील यांनी पदाचा कार्यभार घेतल्यानंतर विविध विभागांचा आढावा घेतला असता ही बाब समोर आली आहे. या आढाव्यात सन २०१८-२०१९ या दोन वर्षात जीपीडीपी आराखडा अपलोड करण्याचे काम बाकी असल्याचे निदर्शनास आले आहे. ११४९ पैकी केवळ १० ग्रामपंचायतींनीच आराखडा अपलोड केला आहे. अन्य ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक, प्रशासनाने याकामी दिरंगाई केली आहे. शनिवारपर्यंत टॅगिंगचे फोटो काढून अपलोड न केल्यास संबंधितांवर कारवाईच्या सूचनाही त्यांनी संबधित विभागास देण्यात आल्या आहेत.