Home राज्य पतीसाठी रोहिणी खडसे मैदानात : काळा कोट घालून न्यायालयात हजर !

पतीसाठी रोहिणी खडसे मैदानात : काळा कोट घालून न्यायालयात हजर !


पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी आज आपले पती प्रांजल खेवलकर यांच्यासाठी पुणे कोर्टात अंगावर वकिली कोट चढवून हजेरी लावली.

रोहिणी खडसे या स्वत: वकील असून आज त्यांनी पुणे कोर्टात काळा कोट चढवून हजेरी लावली. या माध्यमातून त्यांनी प्रतिकात्मक पध्दतीत काळा कोट घालून सरकारचा निषेध तर केलाच पण पतीसाठी आपण स्वत: मैदानात उतरल्याचे दाखवून दिले.

तीन दिवसांपूर्वी रोहिणी खडसे यांचे पती कथित रेव्ह पार्टी करतांना पकडले गेले असून आधी त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. यानंतर आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात येत असतांना रोहिणी खडसे या स्वत: त्यांच्या बचावासाठी धावून आल्याचे दिसून येत आहे. आज सकाळीच आमदार एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या जावयाला राजकीय सूडबुध्दीने अडकवण्यात आल्याचा आरोप केला होता.


Protected Content

Play sound