Home क्राईम जळगाव रेल्वे स्थानकावर आढळला अनोळखी मृतदेह; ओळख पटवण्यासाठी आवाहन

जळगाव रेल्वे स्थानकावर आढळला अनोळखी मृतदेह; ओळख पटवण्यासाठी आवाहन


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव रेल्वे स्थानकावर शुक्रवारी (२६ जुलै) सकाळी साडेदहा वाजण्यापूर्वी एका अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळला. रेल्वे स्थानकावरील नवीन जिन्याच्या रॅम्पवर ते आजारी अवस्थेत मिळून आले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल केले असता, त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. रेल्वे पोलिसांनी या अनोळखी व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे.

रेल्वे पोलीस चौकी, जळगाव येथे स्टेशन मास्तर श्री. ठाकूर यांनी या घटनेची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे वय अंदाजे ६५ वर्षे असून, त्यांनी पांढऱ्या रंगाचा मळकट शर्ट आणि राखाडी रंगाची पॅन्ट परिधान केली होती. त्यांचे केस आणि दाढी वाढलेली होती. ते सडपातळ बांध्याचे आणि सावळे रंगाचे होते.

पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, अज्ञात व्यक्तीचा कोणत्यातरी दीर्घ आजारामुळे नैसर्गिकरीत्या मृत्यू झाला असावा. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे ओळख पटवण्यासाठी ठेवण्यात आला आहे.

रेल्वे पोलीस जळगाव यांनी आवाहन केले आहे की, ज्यांना कोणाला या व्यक्तीबद्दल माहिती असेल किंवा त्यांची ओळख पटवता येत असेल, त्यांनी तात्काळ रेल्वे पोलीस चौकी, जळगाव येथे संपर्क साधावा. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन भावसार, रेल्वे पोलीस जळगाव हे करत आहेत.


Protected Content

Play sound