जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील संतोषी माता नगर परिसरात एका व्यापाऱ्याचे बंद दुकान फोडून दुकानातून १२ हजार रूपयांची रोकड चोरून नेल्याची घटना रविवारी १३ जुलै रोजी सकाळी ७ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी २६ जुलै रोजी रात्री ८.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, शेख आलम अब्दुल रऊफ वय ४२ रा. मास्टर कॉलनी, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे संतोषी माता नगरात किरणा दुकान आहे. १२ ते १३ जुलै दरम्यान त्यांचे किराणा दुकान बंद असतांना संशयित आरोपी मोबीन खान युसूफ खान वय २५ रा. नशेमन कॉलनी, जळगाव याने त्यांचे दुकान फोडून दुकानातून १२ हजार रूपयांची रोकड चोरून नेली. या संदर्भात व्यापारी शेख आलम अब्दुल रऊफ यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मोबीन खान युसूफ खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील हे करीत आहे.




