Home Cities जळगाव भव्य मिरवणुकीने खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांचे जल्लोषात स्वागत !

भव्य मिरवणुकीने खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांचे जल्लोषात स्वागत !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खासदार पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच जळगाव शहरात आगमन झालेले ॲड. उज्ज्वल निकम यांचे आज सकाळी जळगावकरांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि प्रचंड जल्लोषात स्वागत केले. सकाळी ७.३० वाजता मुंबईहून महानगरी एक्स्प्रेसने त्यांचे जळगाव स्थानकावर आगमन झाले. त्यांचे आगमन होताच जल्लोष आणि घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला. ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत…

यानंतर, ॲड. निकम यांनी सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर, खुली जीपमधून त्यांची मिरवणूक सुरू झाली. मिरवणूक पुढे जात असताना, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासही अभिवादन केले. शहरातील जी.एम. फाउंडेशन येथे त्यांचे स्वागत करण्यात आले.

मिरवणूक स्वातंत्र चौक, आकाशवाणी चौकमार्गे बॅरिस्टर निकम चौक येथील त्यांच्या निवासस्थानाकडे निघाली. मार्गावर ठिकठिकाणी नागरिक आणि कार्यकर्ते स्वागतासाठी थांबले होते. जळगावकरांनी आपल्या लाडक्या खासदाराचे जंगी स्वागत करून त्यांच्यावरील प्रेम व्यक्त केले. हा स्वागत सोहळा जळगावातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.


Protected Content

Play sound