Home Cities भुसावळ जनविश्वास सप्ताहानिमित्त भुसावळात भव्य आरोग्य शिबिर 

जनविश्वास सप्ताहानिमित्त भुसावळात भव्य आरोग्य शिबिर 


भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्ताहानिमित्त भुसावळ शहरात भव्य मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास भुसावळकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. समाजासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या उपक्रमामुळे रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले.

या आरोग्य शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस भुसावळ शहराच्या वतीने करण्यात आले होते. शिबिरात जळगाव जिल्ह्यातील नामवंत गोल्ड सिटी हॉस्पिटल, गोदावरी हॉस्पिटल येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत विविध तपासण्या करण्यात आल्या. विशेषतः हृदयविकार, कॅन्सर गाठ, हाडांचे विकार, डोळ्यांची समस्या, ईसीजी, शुगर आणि ब्लडप्रेशर, फिजीओथेरपी, स्त्रीरोग तसेच स्टोनच्या उपचारासाठी तपासण्या करण्यात आल्या. रुग्णांना या तपासण्यांसह आवश्यकतेनुसार मोफत औषधे देखील वाटप करण्यात आली.

या उपक्रमासाठी वसीम शेख आणि निराज खराटे यांनी नियोजनात्मक जबाबदारी पार पाडत उत्कृष्ट समन्वय साधला. जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, शहराध्यक्ष संतोष चौधरी (दाढीभाऊ), युवक जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडीया, वसीम शेख, नदीम बागवान, निलेश कोलते, मुन्ना सोनवणे, पवन बहिरुणे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या शिबिरात सहभागी झाले होते.

नागरिकांना मोफत आरोग्य सेवा पुरवून त्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता. या उपक्रमामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेच्या आरोग्याचा विचार करत सामाजिक बांधिलकी जपल्याचे स्पष्ट झाले.


Protected Content

Play sound