Home क्राईम चोरट्यांचा धुमाकूळ : कुसुंबा येथील तरूणाचे बंद घर फोडले

चोरट्यांचा धुमाकूळ : कुसुंबा येथील तरूणाचे बंद घर फोडले


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना १५ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली असून, या संदर्भात गुरुवारी, २४ जुलै रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रशेखर अर्जुन शिंपी (वय ३९, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) हे आपल्या कुटुंबासह जळगाव येथे राहतात. त्यांचे मूळ घर जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे असून, त्यांची आई तेथे राहते. १५ जुलै रोजी त्यांचा कुसुंबा येथील घर बंद होते. याच कालावधीत, अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातून १७ हजार रुपयांची रोख रक्कम आणि १० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण २७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

ही चोरीची घटना १५ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास समोर आली. चंद्रशेखर शिंपी यांनी तात्काळ एमआयडीसी पोलिसांत या घटनेची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गफूर तडवी करत आहेत.


Protected Content

Play sound