Home Uncategorized जुगार अड्ड्यावर छापा ; १ लाख ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त !

जुगार अड्ड्यावर छापा ; १ लाख ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त !


एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कासोदा शहरातील साईबाबा मंदिरा जवळील भवानी नगर परिसरात चालणाऱ्या एका पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर कासोदा पोलिसांनी यशस्वी छापा टाकत पाच जुगारींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत १ लाख ४३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, प्रभारी अधिकारी निलेश राजपूत यांना २३ जुलै रोजी दुपारी माहिती मिळाली की, कासोदा शहरापासून दूर असलेल्या एका शेतात लिंबाच्या झाडाखाली काही इसम पत्त्यांचा जुगार खेळत आहेत. ही जागा लांब असल्याने, पोलीस पथकाने जुगारींना पकडण्यासाठी विशेष रणनीती आखली.

पोलीस अंमलदार पोहेका नरेंद्र गजरे, पोना प्रदीप पाटील, पोकों समाधान तोंडे, पोकों निलेश गायकवाड, पोकों दीपक देसले आणि पोकों कुणाल देवरे यांच्या पथकाने आडवाटेने सुमारे दीड किलोमीटर पायी जात जुगार अड्ड्याजवळ पोहोचले. पोलिसांची चाहूल लागताच जुगारी पळून जाऊ लागले, परंतु पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून शिताफीने त्यांना ताब्यात घेतले.

घटनास्थळी ईश्वर सुकलाल महाजन, अक्षय राजेंद्र शिंपी, प्रवीण आत्माराम पाटील, कैलास निंबा चौधरी आणि गणेश प्रकाश मराठे हे जुगारी मिळून आले. त्यांच्यावर कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या छाप्यात १३ हजार ७५० रुपये रोख रक्कम आणि १ लाख ३० हजार रुपये किमतीच्या तीन मोटारसायकली असा एकूण १ लाख ४३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पुढील तपास पोहेका राकेश खोंडे करीत असून, कासोदा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांवरील कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


Protected Content

Play sound