Home क्राईम धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने अनोळखी तरुणाचा मृत्यू!

धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने अनोळखी तरुणाचा मृत्यू!


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव ते भादली दरम्यानच्या अप रेल्वे मार्गावर सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास एका अनोळखी तरुणाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागून मृत्यू झाला. याबाबत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच, आसोदा शिवारात जळगाव ते भादली दरम्यानच्या अप रेल्वे मार्गावर खांबा क्रमांक ४२३/६ ते ४२३/८ दरम्यान ही घटना घडली. तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी सोपान पाटील आणि त्यांचे सहकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील कार्यवाहीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवला. मृत तरुणाचे वय अंदाजे २० ते २५ वर्षांदरम्यान असावे, असे पोलिसांनी सांगितले. त्याची अद्याप ओळख पटलेली नाही.

या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. मयत तरूणाची ओळख पटवावी असे आवाहन पोलीसांनी केले आहे.


Protected Content

Play sound