Home क्राईम कंडारी येथील वृध्दाचा संशयास्पद मृत्यू; पोलीसात घटनेची नोंद

कंडारी येथील वृध्दाचा संशयास्पद मृत्यू; पोलीसात घटनेची नोंद


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कंडारी येथील रहिवाशी असलेले ७४ वर्षीय वृध्दाने हजाम टेकडी परिसरातील वाघुर नदीजवळ एका झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले. हा प्रकार शनिवारी १९ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता समोर आली. दरम्यान संशयास्पद मृत्यू झाल्याची चर्चा परिसरात होत असल्याचे दिसून आले. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भिमराव रामदास परदेशी (वय ७४, रा. कंडारी, ता.जि. जळगाव) असे मयत झालेल्या वृध्दाचे नाव आहे.

भिमराव परदेशी हे आपल्या पत्नी, मुले, सुना व नातवंडे यांच्या सोबत जळगाव तालुक्यातील कंडारी गावात वास्तव्याला होतो. शनिवारी १९ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास भिमराव परदेशी यांनी वाघूर धरणाजवळील हजाम टेकडी येथील एका झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार गावात राहणारा हर्षल बाविस्कर या तरूणाला समजले. त्याने तातडीने नशिराबाद पोलीसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलीस कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. ज्याठिकाणी त्यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत संशयास्पद असल्याचे दिसून आले. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी हे करीत आहे.


Protected Content

Play sound