Home Cities अमळनेर किरकोळ कारणावरून तरूणाला बेदम मारहाण; पाच जणांवर गुन्हा दाखल

किरकोळ कारणावरून तरूणाला बेदम मारहाण; पाच जणांवर गुन्हा दाखल

0
282

अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे एका तरूणाला किरकोळ कारणावरून पाच जणांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना १८ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रविवारी २० जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता मारवड पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश दत्तू गायकवाड वय २५ रा. कळमसरे हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शुक्रवारी १८ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता दिनेश गायकवाड हा घरी असतांना जुन्या वादातून गावात राहणारे संजय शिवदास ठाकरे, सुरेश आबा भील, गणेश आबा भिल, लक्ष्मण प्रविण भिल आणि चेतन हिम्मत चौधरी यांनी दिनेश गायकवाड याला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दिनेश गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारे संजय शिवदास ठाकरे, सुरेश आबा भील, गणेश आबा भिल, लक्ष्मण प्रविण भिल आणि चेतन हिम्मत चौधरी सर्व राहणार कळमसरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound