धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या भांडणाच्या कारणावरून धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथील दोन वृध्द भावांना बेदम मारहाण करत एकाचा हात फ्रॅक्चर केल्याची घटना ९ जून रोजी सकाळी ८ वाजता घडली आहे. याबाबत शुक्रवारी १८ जुलै रोजी दुपारी अडीच वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथे डिगंबर नारायण पाटील वय ७८ हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ९ जून रोजी सकाळी ८ वाजता जुन्या भांडणाच्या कारणावरून डिगंबर पाटील व त्यांचा भाऊ झिंगा पाटील यांना गावात राहणारा शांताराम आत्माराम पाटील याने दोन्ही भावांना शिवीगाळ मारहाण केली. तर डिगंबर पाटील यांचा हात पिरगळून फ्रॅक्चर करून तुम्ही गावात कसे राहतात अशी धमकी दिली. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार घेण्यात आले. याप्रकरणी अखेर शुक्रवारी १८ जुलै रोजी दुपारी अडीच वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात झिंगा पाटील यांनी फिर्याद दिली. त्यानुसार मारहाण करणारा शांताराम आत्माराम पाटील रा. दोनगाव ता.धरणगाव याच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ संदीप खंडारे हे करीत आहे.




