Home राजकीय मध्यरात्री विधीमंडळ परिसरात राडा : जितेंद्र आव्हाड यांचा ठिय्या !

मध्यरात्री विधीमंडळ परिसरात राडा : जितेंद्र आव्हाड यांचा ठिय्या !


मुंबई-प्रतिनिधी | काल जितेंद्र आव्हाड व गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर आरोपींच्या अटकेसाठी आमदार आव्हाड यांनी विधीमंडळ परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास ठिय्या मांडल्याने खळबळ उडाली. सुमारे एक तासापर्यंत हा सर्व प्रकार चालला.

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात संघर्ष सुरू असल्याचे दिसून येत आहे. आधी दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दीक वाद झाले. यानंतर काल दुपारी तर दोघांचे समर्थक एकमेकांना भिडले. यात पडळकर यांच्या समर्थकांनी आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. यात हल्लेखोरांचे टार्गेट हे आपण असल्याचा आरोप आव्हाड यांनी संध्याकाळी पत्रकारांशी बोलतांना केला.

दरम्यान, या प्रकरणी रात्री धरपकड सुरू झाली. यात ज्यांना मारण्यात आले त्याच जणांना पोलीस अटकेसाठी आल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेत विधीमंडळ भवन परिसरातच ठिय्या मांडला. त्यांनी थेट पोलिसांच्या वाहनासमोर बसून घोषणाबाजी सुरू केली. यामुळे पोलिसांनी त्यांना फरपटतच बाहेर काढले. याप्रसंगी त्यांच्या सोबत आमदार रोहित पवार हे देखील होते.
ते.
या सर्व प्रकारावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अतिशय तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याचा आरोप त्यांनी केला. तर आज विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात या घटनेचे पडसाद उमटणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.


Protected Content

Play sound