अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर येथील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी कोल्हापूर येथे माहेरून गाडी घेण्यासाठी ८ लाख रूपयांची मागणी करत शिवीगाळ करत मारहाण करत छळ केल्याची प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी १६ जुलै रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर येथील माहेर असलेल्या भाग्यश्री तेजस पाटील वय २३ यांचा विवाह कोल्हापूर येथील तेजस सत्यजीत पाटील यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला आहे. लग्ना नंतर काही महिन्यानंतर विवाहितेला गाडी घेण्यासाठी माहेराहून ८ लाख रूपयांची मागणी करण्यात आली. दरम्यान विवाहितेच्या माहेरच्यांची परिस्थिती हालाखीची असल्याने पैसे आणले नाही. या रागातून विवाहितेला शारिरीक व मानसिक छळ करण्यास सुरूवात करण्यात आली. वेळप्रसंगी मारहाण देखील करण्यात आली. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी अमळनेर येथे निघून आल्या. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती तेजस सत्यजीत पाटील, सासू विद्या सत्यजीत पाटील, मावस सासू हेमलता श्रीधन मेघे, मावसा श्रीधर सुरेश पाटील सर्व राहणार कोल्हापूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ विनोद सोनवणे हे करीत आहे.




