Home क्राईम महिलेच्या घरात घुसून विनयभंग; नाशिकमधील चौघांविरोधात गुन्हा दाखल!

महिलेच्या घरात घुसून विनयभंग; नाशिकमधील चौघांविरोधात गुन्हा दाखल!


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शाहू नगरातील एका भागात राहणाऱ्या ५८ वर्षीय महिलेच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने घुसलेल्या चौघांनी महिलेला शिवीगाळ करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी १४ जुलै रोजी दुपारी १ वाजता घडली असून, या प्रकरणी बुधवारी १६ जुलै रोजी रात्री १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील शाहू नगरात ५८ वर्षीय महिला तिच्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. सोमवारी दुपारी १ वाजता ही महिला तिच्या घरी एकटी असताना, सुवर्णा चेतन जोमिवाडे, महादू रामभाऊ चवंडके, राकेश महादू चवंडके आणि अक्षय महादू चवंडके (सर्व रा. नाशिक) हे चौघे जण बेकायदेशीरपणे आणि चोरी करण्याच्या उद्देशाने तिच्या घरात घुसले. घरात घुसल्यानंतर त्यांनी महिलेला मारहाण केली, शिवीगाळ केली आणि तिचा विनयभंगही केला.

या घटनेने भयभीत झालेल्या महिलेने बुधवारी रात्री १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुवर्णा चेतन जोमिवाडे, महादू रामभाऊ चवंडके, राकेश महादू चवंडके आणि अक्षय महादू चवंडके या नाशिक येथील चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल वंदना चव्हाण करत आहेत.


Protected Content

Play sound