जामनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील शहरपूर गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ मागून येणाऱ्या भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी १३ जुलै रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात दुसऱ्या दुचाकीस्वारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनकर सिताराम सोनवणे वय ५५ रा. निशाणे ता.धरणगाव असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
दिनकर सोनवणे हे त्यांच्या सहकारी डिगंबर शेरे यांच्या सोबत रविवारी १३ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक (जीजे ०५ एमएम ९८७०) ने जामनेर तालुक्यातील शहापूर गावाजवळील पेट्रोल पंपाजवळून जात असतांना त्यांच्या मागून भरधाव वेगाने येणारी दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीआर ८१३२) वरील चालक चेतन विजय पारधी वय २२ रा. जळाद्री ता, जामनेर याने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार दिनकर सोनवणे यांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या सोबत मागे बसलेले डिगंबर शेरे हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात दुचाकीचालक चेतन पारधी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजू तायडे हे करीत आहे.




