
जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरातील साईबाबा मंदिराजवळ काहीही कारण नसताना एका तरुणाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत जळगाव शहरात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय संजय काकोकर वय 22 राहणार शिवाजीनगर हातरून आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे दरम्यान गुरुवारी 10 जुलै रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील गेंदलाल मिल परसरातून पायी जात होता. त्यावेळी त्याला मुन्ना तसेच गुरफान आणि बाबा (तिघांचे पूर्ण नाव माहित नाही) रा. जळगाव या तिघांनी काहीही कारण नसताना अक्षयचा रस्ता अडविला आणि त्याला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. यामध्ये अक्षय हा जखमी झाला त्याला शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांनी दिलेल्या जबाबावरून मारहाण करणारे बाबा मुन्ना आणि गुरफान अशा तीन जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ प्रमोद कंखरे हे करीत आहे.



